पाचोर्‍यात गावठान जमिनी मोजण्यास सुरुवात, अतिक्रमण धारकांना लाभ.

0
55

पाचोरा- स्वामीत्व योजने अंतर्गत गावठाण जमिनींच्या ड्रोन मोजणी अभियानास पाचोरा तालुक्यात शुक्रवारी आ.किशोर पाटील यांचे हस्ते प्रारंभ करण्यात आला.

स्वामीत्व योजनेअंतर्गत राज्यातील गावठाण भागातील आठ अ ला ग्रामपंचायत उताऱ्यावर लावलेल्या जमिनींची ड्रोनच्या साहाय्याने मोजणी करून त्याच्या मिळकत पत्रिका तयार केल्या जाणार असून यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेले वाद मिटण्यासाठी मदत मिळणार आहे या मोजणीचा आगामी १०० वर्षे फायदा मिळणार आहे मिळकत धारकांचे नावे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार असल्याने त्यांना शासनाच्या घरकुलासह तारण, गृहकर्ज आदी लाभ मिळणार असल्याने ग्रामस्थांमधून या योजनेचे स्वागत होत आहे.

पाचोरा तालुक्यातील आ.किशोर पाटील यांचे मुळगाव अंतुर्ली येथून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे, भूमीअभिलेख अधिकारी राजू घेटे, यशवंत बिऱ्हाडे, मोजणी अधिकारी उगलमुगले , चौधरी , सरपंच तुळसाबाई पाटील, उपसरपंच प्रदीप पाटील , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

आ. किशोर पाटील यांनी या योजनेचे कौतुक करत आपसातील तंटे सुटण्यास मदत मिळणार असल्याने गावा गावात सलोखा निर्माण होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगत ड्रोन मोजणी अधिकाऱ्यांना योग्य सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष बंडू चौधरी, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती.

Spread the love