खडकोद येथील भागवताचार्य कन्हैया महाराजांची दीनदयाळू सोबत दिवाळी!

0
40

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – दिवाळी सणाच्या निमित्ताने अनेक अनुभव पाहायला मिळतात. धन धन दिवाळी असे म्हटले जाते ज्यांच्या जवळ पैसा त्याची दिवाळी असा समज आहे मात्र, अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात की सर्व काही असूनही गरीबांच्या झोपडीत जाऊन दिवाळी साजरी करणारे काही महानुभव या जगात आहेत. असाच काही अनुभव मध्यप्रदेश असलेल्या बऱ्हाणपूर परिसरातील नागरिकांना आला. प्रसिध्द किर्तनकार हभप भागवताचार्य कन्हैया महाराज (खडकोद) यांनी दिवाळीच्या दिवशी व  दुसऱ्या दिवशी परिसरातील वाड्यावस्ती व झोपडीत राहणा-या गरीब कुटुंबात जाऊन मिठाई दिली व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या मिठाई मिळाल्याने या गरीब कुटुंबातील बालगोपाल व वयस्क व्यक्तींनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. संतांनी म्हटले आहे” जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तो ची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा” ! या अभंगाचा प्रत्यय खऱ्या अर्थाने समाजासमोर आला.

Spread the love