भारतीय मुस्लिमांना फक्त १५ मिनिटं सत्ता द्या, पाकिस्तानला…; AIMIMच्या नेत्याचं मोठं विधान

0
25

पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना भारताने धडा शिकवला. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ तळ उद्ध्वस्त केले. पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात संतापाची लाट आहे.

यातच आता ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)च्या नेत्याने मोठं विधान केलंय. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय मुस्लिमांना फक्त १५ मिनिटांसाठी सत्ता द्या अशी मागणी एमआयएमच्या नेत्यानं केलीय.

एमआयएमचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष शोएब जमई यांनी पाकिस्तानवर संताप व्यक्त करताना म्हटलं की, भारताच्या मुस्लिमांना फक्त १५ मिनिटांसाठी सत्ता द्या. आम्ही दाखवू की पाकिस्तानला कसं उद्ध्वस्त केलं जाऊ शकतं. भारताच्या मुस्लिमांनी या टू नेशन थेअरीला रिजेक्ट केलं आणि यानंतर देशासाठी जी भूमिका घेतली ती अविस्मरणीय आहे.

एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शोएब यांनी म्हटलं की, काल जे दीड वाजता झालं ते इतिहासात नोंद होईल. हा खूप मोठा मैलाचा दगड आहे. खूप दिवसांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा जो अड्डा होता तो उद्ध्वस्त करणं गरजेचं होतं. आमच्या सीमेत येऊन जे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील त्यांचा विध्वंस करू. त्यांचे डोळे काढण्याची गरज असल्याचं शोएब म्हणाले.

जमई शोएब यांनी म्हटलं की, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताच्या पंतप्रधानांसह इथल्या लोकांना आव्हान दिलं होतं. आथा पाकिस्तानने मसूद अजहरच्या नातेवाईकांचा धर्म विचारावा. धर्म विचारून मारलं कारण त्यांना देशात हिंदू-मुस्लिम यांच्यात द्वेष पसरवायचा होता.

Spread the love