जळगाव – : फुफनगरी फाट्याजवळ डंपर-दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तरुणाचा ताबा सुटल्याने भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या डंपरला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात घडला.
या अपघातात पंकज शंकर कोळी (वय – २६ वर्ष) आणि अमोल आनंदा कोळी (वय – २७ वर्ष) अशी दोन्ही मयत तरुणांची नावे आहेत. दोन्ही मयत तरुण हे जळगाव तालुक्यातील घार्डी या एकाच गावचे रहिवासी आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नागरिकांनी मदतकार्याला सुरुवात केली. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतील. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच दोन्ही तरुणांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.