दिपक नेवे
यावल तालुक्यातील शिरसाड येथील युवा ग्रामपंचायत सदस्य तथा यावल तालुका शेतकी खरेदी विक्री संघाचे संचालक तेजस धनंजय पाटील यांच्या संकल्पनेतून आधार फाउंडेशन माध्यमातून मागील 2 वर्षापासून भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला गावाजवळील आदिवासी पाड्यावर जाऊन महिला भगिनींना फराळ व साडी वाटप करण्यात येत आहे. शिरसाड गावाला लागून असलेल्या २-३ पाड्यावर जाऊन हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शिरसाड येथील ज्येष्ठ नागरिक प्रताप नाना पाटील, पांडुरंग काका मराठे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश काका सोनवणे, वासुदेव दादा सोनवणे, ज्ञानेश्वर दादा सोनवणे, डीगू दादा महाजन, प्रभाकर भाऊ जाधव, विष्णु भाऊ सोनवणे, किशोर दादा बडगुजर, बापू दादा पाटील, दीपक दादा खंबायत, किशोर दादा इंगळे, आबा दादा ठाकूर, राहुल दादा भालेराव, विकास दादा वाघ, विशाल भाऊ इंगळे, श्रीकृष्ण भाऊ शिरोळे, लीलाधर भाऊ धनगर, विकास दादा अटवाल, सागर भाऊ सोनवणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
तेजस पाटील नेहमी सामाजिक कार्याद्वारे विविध उपक्रम राबवित असतात. यावर्षी दिवाळीच्या दिवशी त्यांनी गावातील सर्व ग्रामदैवतांची पूजा करून गावातील सर्व कष्टकरी, शेतकरी, युवा वर्ग, महिला वर्ग व संपूर्ण गावकऱ्यांना सुख-समृध्दी लाभो अशी प्रार्थना केली.












