भिलाट बाबांच्या देवदर्शना साठी जाणाऱ्या गोजोरा येथील तरुणांचे अपघाती निधन.

0
58

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ -: तालुक्यातील गोजोरा येथील दोन तरुण श्रावण मासा निमित्त मोटर सायकलने चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथील भिलाट बाबा देवस्थान येथे दर्शनासाठी जात असताना अडावद गावा जवळ मोटरसायकल व बोलेरो मालवाहतूक वाहनाचा अपघात झाला. ही घटना दि.२८ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडल्याचे समजते .या अपघातात महेंद्र शांताराम कोळी ( वय ३६ ) व युवराज उर्फ भुरा तुकाराम तायडे ( कोळी वय ३३) या दोघांचे निधन झाले. महेंद्र कोळी याच्या पश्चात आई ,वडील ,पत्नी ,दोन मुले व भाऊ आहेत तर युवराज तायडे याच्या पश्चात आई , पत्नी ,दोन मुले ,भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघाताची घटना समजताच गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी ,पोलीस पाटील ,सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी अडावद येथे धाव घेतली .या वेळी घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह चोपडा रुग्णालयात नेले व तेथून गोजोरा येथे अंत्यसंस्कार केले.दोन्ही मयत तरुण मनमिळावू स्वभावाचे होते.या घटनेने गोजोरा गावात शोककळा पसरली आहे.

Spread the love