भामलवाडी येथे सौ. सुरेखा कोळी यांच्या हस्ते जल जीवन मिशनच्या कामाचे भूमिपूजन

0
46

भामलवाडी येथे सुमारे दोन वर्ष झाले जुनी पाण्याची टाकी जीर्ण झाल्यामुळे ती पाडण्यात आली होती.आणि गावातील लोकांचे पाण्यामुळे खूप हाल होत होते.त्यांना वेळेवर स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी मिळत नव्हते.आणि आता जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाण्याची टाकी मंजूर झाल्यामुळे गावातील महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.की आता तरी आपल्याला मुबलक पाणी मिळेल.आणि म्हणून संपूर्ण गावाच्या वतीने असे ठरविण्यात आले की आपल्या गावातील पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन सौ.सुरेखा विनोद कोळी.एक सामाजिक कार्यकर्त्या यांच्या हस्ते करण्यात यावे.

आज पर्यंत आपण पाहिले आहे की कोणत्याही नवीन कामाचे भूमिपूजन राजकारणी लोकांच्या हस्ते करण्यात येते.परंतु भामलवाडी गावच्या लोकांनी ही परंपरा मोडत एका सर्व साधारण महिलेच्या हातून भूमी पूजनाचा कार्यक्रम पार पाडला.ह्या प्रसंगी ग्रामसेवक अजय महाजन,ठेकेदार ज्ञानेश्वर अमले, तुकाराम पाटील,माणिक पाटील,प्रल्हाद कोळी ,गुलाबराव पाटील,वसंत पाटील,दिलीप महाराज,शिवाजी पाटील सतीश बर्वे, जेसीबी चालक देवानंद कोळी. आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

Spread the love