भुसावळ येथे आगामी सण उत्सवासाठी शांतता समितीची बैठक संपन्न.

0
28

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – येथील शांती नगरातील कमल गणपती हॉल मध्ये भुसावळ पोलीस उपविभागाचे पोलीस उप अधिक्षक कृष्णांत पिंगळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव निमित्त तसेच श्री रामनवमी व श्री हनुमान जयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणूका शांततेत पार पाडण्यात याव्यात यासाठी उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील शहरातील व गावागावातील पदाधिकारी ,पोलीस पाटील ,शांतता समिती सदस्य यांची बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक पदाधिकारी व उपस्थित सदस्यांनी सूचना दिल्या. यावेळी महिला पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर पोलीस स्टेशन चे पोनि डमाळे साहेब यांनी तर आभार बाजार पेठ चे पोनि राहुल वाघ साहेब यांनी मानले.अध्यक्षीय भाषणात पिंगळे साहेबांनी सर्वांच्या प्रश्न व सूचनांचा आदर करीत मार्ग मोकळा केला व मिरवणूक शांततेत पार पाडावी असे आवाहन केले. यावेळी तालुका पोलीस स्टेशन चे पोनि महेश गायकवाड साहेब , शहर वाहतूक शाखेचे एपीआय महाले साहेब व पोलीस तसेच होमगार्ड कर्मचारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Spread the love