प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – जळगाव पोलीस अधीक्षक डाँ .महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतुन भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शाळांमध्ये जाऊन तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि. महेश गायकवाड यांनी गुरु पौर्णिमा निमित्ताने शिक्षकांचा सत्कार केला. यावेळी आदर्श आयटीआय कुऱ्हा पानाचे येथील प्राचार्य श्री. कुरेशी सर, कुऱ्हा पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय येथील मुख्याध्यापक श्री. चौधरी सर, वराडसीम येथील पंडीत नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. खेडकर सर, दादासाहेब दामू पाटील विद्यालय, सुनसगाव येथील श्री. जे.पी.सपकाळे सर यांना गुरूपौर्णिमा निमित्ताने शुभेच्छा दिल्या तसेच प्रतिनिधिक स्वरूपात या सर्व मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला . सुनसगाव येथील दादासाहेब दामु पांडू पाटील माध्यमिक विद्यालयात छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी पो.नि. महेश गायकवाड व पोऊनि पुजा अंधारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुका पोलीस स्टेशन चे विनोद पाटील , श्री येवलकर ,पत्रकार जितेंद्र काटे , सामाजिक कार्यकर्ते प्रविण दांडगे हे उपस्थित होते.