प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुका श्री महर्षी वाल्मिक जयंती सार्वजनिक उत्सव समितीच्या बैठकीत गोजोरे येथील माजी सैनिक व सरपंच पती लक्ष्मण कोळी यांची एकमताने निवड करण्यात आली. भुसावळ तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहिर करण्यात आली – अध्यक्ष लक्ष्मण कोळी ( गोजोरा ) , उपाध्यक्ष – राज पाटील ( भुसावळ शहर ) , उपाध्यक्ष – समाधान कोळी (साकेगाव) ,सचिव – मंजित कोळी ( भुसावळ ) ,खजिनदार – महेश कोळी तसेच इतर सदस्य यांची निवड करण्यात आली आहे. महर्षी वाल्मिक जयंती संपूर्ण तालुक्यात शांततेच्या मार्गाने व विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात येणार असल्याचे लक्ष्मण कोळी यांनी सांगितले आहे.