भुसावळ तालुक्याची आम सभा होणार की नाही ?

0
21

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील अनेक वर्षे झाली प्रश्न प्रलंबीत आहेत मात्र या बाबत बोलायला कोणीही तयार नाही विशेष म्हणजे आमदार साहेबांना सांगू असे म्हणताच गाव पातळी वरील कार्यकर्ते पदाधिकारी ऐकून घ्यायला तयार नाहीत.त्यामुळे आमसभा झाली तर हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल असे अनेकांना वाटत असले तरी ‘ अपने राज्य में अलबेल हैं । ‘ असा संदेश पाठवणारे असल्याने मनापासून प्रेम करणाऱ्या मतदारांच्या मनातील भावना वस्रोद्योग मंत्री ना.संजयभाऊ सावकारे यांच्या पर्यंत पोहचत नसल्याने मतदार संघातील अनेक हक्काचे मतदार नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे संजयभाऊ फक्त आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला कोणत्याही बांधकामाचा ठेका देतात ? अशी व्दिदाअवस्था निर्माण करणारा प्रश्न अनेकांना पडला असून जर मतदार संघात तालुका पातळीवर आमसभा घेतली तर मतदारांच्या मनातील खदखद बाहेर येईल असे भुसावळ मतदार संघातील नागरीकांचे म्हणणे आहे. आता यावर मंत्री महोदय काय निर्णय घेणार याकडे मतदार संघातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.

Spread the love