भुसावळ येथे आखाजी सणाच्या निमित्ताने माहेरवाशीण महिलांसाठी मनोरंजन सोहळ्याचे आयोजन !

0
35

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – येथील काशिराम नगरातील कपिलेश्वर महादेव मंदीरा जवळ १ मे रोजी संध्याकाळी ५ वाजे पासून आखाजी सणाचे औचित्य साधून माहेरवाशिण महिलांसाठी मनोरंजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय क्रिडा मंत्री खा.रक्षाताई खडसे , सौ.रजनीताई सावकारे , डाँ.केतकीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून आजी माजी नगरसेविका , सामाजिक कार्यकर्ते महिला राहणार असून भुसावळातील सर्व मित्र मंडळ या कार्यक्रमासाठी सहकार्य करणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांना बैलगाडी बसून आणणार आहेत तर नऊवारी साडी नेसून ज्या महिला येतील त्यांच्यासाठी विशेष वस्तू भेट दिली जाणार आहे. या मनोरंजन सोहळ्यात झोके व आखाजीची गाणे ,ऊखाणे ,विविध पारंपारीक खेळ स्पर्धा तसेच सामुहिक डान्स असे आयोजन करण्यात आले असून वयवर्ष १५ च्या पुढील सर्व महिलांना प्रवेश दिला जाणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी व सौ.मिना युवराज लोणारी यांनी केले असून अधिक माहितीसाठी सौ.सुनिता कोल्हे ,सौ.गायत्री नारखेडे ,सौ.चेतना चौधरी ,सौ.मैना शिवसिंग चव्हाण , सौ.किर्ती भंडारे ( माने ) , सौ.रोहिणी गव्हाळ , प्रविण कुटे ,मयुर चिनावले ,संजय विश्वकर्मा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Spread the love