भुसावळ -: ख्रिस्ती सेंट ॲलॉयसिस शाळेने ११ सप्टेंबर या दिवशी इयत्ता ९ वीच्या ‘स्काउट गाईड’च्या विद्यार्थ्यांची शहरात धार्मिक ‘सद्भावना सहल’ काढली.
त्यात मुलींना स्कार्फ (हिजाबप्रमाणे चेहरा झाकून), तर मुलांना डोक्यावर रूमाल बांधून मशिदीत नेण्यात आले. त्यानंतर त्यांना चर्चमध्येही नेण्यात आले. मशीद आणि चर्च येथे २ घंटे अन् मंदिरात केवळ २ मिनिटे विद्यार्थ्यांना नेण्यात आल्याने पालक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी संतप्त होऊन १३ सप्टेंबर या दिवशी शाळेत जाऊन मुख्याध्यापक अन् शिक्षक यांना खडसावले. धार्मिक सलोख्याच्या नावाखाली मुलांचा बुद्धीभेद करत असल्याचा आरोप पालक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी केला आहे.
१. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी प्राचार्या सिस्टर शीला आणि संबंधित शिक्षक अमोल दंदाले यांच्यासमवेत चर्चा केली. धार्मिक सलोखा सहलीसाठी मुलांकडून १०० रुपये शुल्क घेतले; मात्र मुलींना चेहर्यावर स्कार्फ बांधून, तर मुलांना डोक्यावर रुमाल बांधून मशिदीत का नेले ? मशीद आणि चर्च येथे २ घंटे का थांबवले ? मंदिरात मात्र केवळ २ मिनिटे थांबवले होते. मंदिरात जाताना मुलांच्या कपाळावर तिलक का लावला नाही ? असे प्रश्न हिंदुत्वनिष्ठ आणि पालक यांनी विचारले.
२. या वेळी श्री. शाम दरगड, भारती वैष्णव, शिवसेनेचे श्री. दीपक धांडे, भाजपचे श्री. शिशीर जावळे उपस्थित होते. त्यांनी कारवाईची मागणी केली.
3. शिक्षकांनी आधी ‘आमचे काहीही चुकले नाही’, असा पवित्रा घेतला; मात्र हिंदुत्वनिष्ठांनी प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरल्यावर शिक्षकांनी क्षमा मागितली. या वेळी मुख्याध्यापिकांनी सोयीस्कर मौन बाळगले. (एकीकडे असा चुकीचा प्रकार करायचा आणि जाब विचारल्यावर मौन बाळगायचे, अशा मुख्याध्यापकांवरही कारवाई केली पाहिेजे.
शाळेतील हा प्रकार हिंदूंचे खच्चीकरण करून इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्याचा हा पायंडा आहे. ‘सद्भावना सहली’च्या नावाखाली हिंदु विद्यार्थ्यांना हिंदु धर्मापासून वेगळे करून त्यांना इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी त्यांच्या बुद्धीभेदाचा हा प्रकार आहे. याला विरोध करणारे हिंदुत्वनिष्ठ आणि पालक यांचे अभिनंदन ! शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई होईपर्यंत हिंदुत्वनिष्ठांनी हा लढा वैध मार्गाने चालू ठेवावा !
धर्मांतराचा आरोप !
मशिदीत नेल्यानंतर तेथे नमाजपठण कसे केले जाते ? याचे प्रात्यक्षिक एका मुसलमान तरुणाने विद्यार्थ्यांना करून दाखवले. यातून धर्मांतराचा प्रयत्न होत असल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठ आणि पालक यांनी केला आहे, तसेच ‘मंदिरात पुजारी नसल्याने विद्यार्थ्यांना २ मिनिटेच नेण्यात आले होते’, असे कारण शिक्षकांनी दिले; मात्र हिंदुत्वनिष्ठ आणि पालक यांनी याचा निषेध केला आहे.