भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी अनिल वारके तर उपसभापती पदी शिवाजी पाटील बिनविरोध निवड!

0
38

भुसावळ – भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली .या निवडणुकीत एका पॅनलचे १५ संचालक तर एका पॅनलचे तीन संचालक अशी परिस्थिती असल्याने सभापतीपदी खडका येथील अनिल चिंधू वारके तर उपसभापती पदासाठी गोजोरे येथील शिवाजी पंडित पाटील यांची बिनविरोध निवड झाली . यावेळी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सभापती अनिल वारके व उपसभापती शिवाजी पाटील यांनी सांगितले.

Spread the love