भुसावळ – भुसावळ उपविभागीय अधिकारी कार्यालयात दि.२९ मे रोजी दुपारी तीन वाजता भुसावळ ,बोदवड , मुक्ताईनगर या तालुक्यातील ३६ गावातील पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत होणार आहे यात भुसावळ तालुक्यातील १६ गावे पुढीलप्रमाणे, टहाकळी, तळवेल, निंभोराखुर्द, मिरगव्हाण,सुनसगाव, कन्हाळे खुर्द, चोरवड, जोगलखेडे, साकेगाव, जोगलखोरी , बेलव्हाय , पिंपळगाव बुद्रुक, विल्हाळे, खडके, बेलखेडे, पिंप्रीसेकम तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील दहा गावे पुढीलप्रमाणे चारठाणा, राजूर, बेलसवाडी, हिवरे, शेमळदे, पंचाणे, पुरनाड, माळेगांव, सारोळा, पिंप्रीअकाराऊत तसेच बोदवड तालुक्यातील दहा गावे पुढीलप्रमाणे वाकी, साळशिंगी, हरणखेड, वडजी, करंजी, गोळेगावखुर्द, धानोरी, जामठी, रेवती, निमखेड अशा सर्व गावांची आरक्षण सोडत निघणार आहे.