भुसावळ – भुसावळ येथून पुणे येथे जाण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांना परवडणारी तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी सुखकर असणारी हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी दि २० मे २०२३ ते दि.१९ जून २०२३या कालावधीत रद्द करण्यात आली असून ११०२५ / ११०२६ भुसावळ – पुणे – भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच भुसावळ पुणे एक्सप्रेस ला ईगतपुरी भुसावळ मेमुचे रॅक शेअरिंग करण्यात येणार आहे. त्या ऐवजी
1) गाडी क्र.11025 मेमो भुसावळ हुन रात्री 12:35 am.वाजता निघेल आणि ईगतपुरीला सकाळी 06:10 am.वाजता पोहोचेल.
नंतर गाडी क्र.11119 मेमो ईगतपुरी हुन सकाळी 09:55 am.वाजता निघेल,व भुसावळ ला संध्याकाळी 17:10 pm.वाजता पोहोचेल.
2) गाडी क्र.11120 मेमो भुसावळ हुन सकाळी 07:00 am.वाजता निघेल,आणि ईगतपुरी ला दुपारी 15:10 pm.वाजता पोहोचेल.नंतर गाडी क्र. 11026 मेमो ईगतपुरी हुन संध्याकाळी 17:10 pm.वाजता निघेल,व भुसावळ ला रात्री 22:00 pm.वाजता पोहोचेल असे सांगितले जात आहे.
ऐन उन्हाळ्या सुटीच्या कालावधीत रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे अनेक सर्वसामान्य जनतेची गैरसोय झाली असून हुतात्मा एक्स्प्रेस पुर्ववत सुरू राहावी यासाठी प्रवाशी संघटना तसेच खा.रक्षाताई खडसे व खा.उन्मेष पाटील यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी केली जात आहे.