भुसावळ तालुका पोलीसांचे दारु अड्डयावर छापे .( ७१ हजाराचा मुद्देमाल जप्त )

0
37

सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर

भुसावळ -:तालुक्यातील कन्हाळा व किन्ही या ठिकाणी रविवारी सुरू असलेल्या गावठी दारू अड्डयावर तालुका पोलीसांनी छापा ७१ हजार रुपयांची गावठी दारू व मुद्देमाल जप्त केला आहे.

या बाबत भुसावळ तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की ,छट्टू शेकूलाल गवळी ( रा.कन्हाळा )हा त्याच्या घराजवळ गावठी दारू तयार करीत असताना आढळला त्याच्या ताब्यातून ३२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या बाबत पोकाॅ शिवाजी खंडारे यांनी तक्रार दाखल केली असून पोना. संदिप बडगे तपास करीत आहेत तर दुसऱ्या घटनेत किन्ही शिवारात अन्सार रशिद गवळी ( रा . कन्हाळा ) हा दारु तयार करीत असताना पोलिसांनी कारवाई करीत ३८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .ही कारवाई डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे , तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल फुसे , शिवाजी खंडारे ,सुभान तडवी , गणेश राठोड सह तालुका पोलीसांच्या पथकाने केली.

Spread the love