भुसावळ तालुका पोलीसात दाखल गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्याच्या संशयावरून घर पेटवले ? भुसावळ तालुक्यातील वांजोळे गावातील घटना 

0
46

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ पासून जवळच असलेल्या वांजोळे गावातील मागील गुन्ह्यात भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या आरोपीला मदत करण्याच्या संशयावरून कुलूप बंद असलेले घर पेटवल्याची घटना घडल्याने भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत फिर्यादी भिमराव गंभीर तायडे वय ५५ रा.वांजोळा ता भुसावळ यांनी फिर्याद दिली आहे की दि २४ मे रोजी दुपारी १ ते १:३० वाजेच्या सुमारास पंकज निवृत्ती तायडे , रविंद्र आनंदा मोरे , साधना रविंद्र मोरे , सुभाष वना मोरे सर्व रा.वांजोळा यांनी वरील तारखेस फिर्यादी यांचा वांजोळा गावातील साडूचा मुलगा कैलास अशोक तायडे हा फिर्यादीच्या घरी पाणी पिण्यासाठी आला होता व तो एका गुन्ह्यात आरोपी असल्याने फिर्यादी व त्यांचा परिवार त्यास मदत करत असल्याबाबत यातील आरोपीतांनी संशय घेऊन संगनमताने फिर्यादीस आरोपी क्र १ ) पंकज निवृत्ती तायडे याने तोंडावर व कपाळावर बुक्का मारला व त्याच्या हातात असलेल्या कशाने तरी जखम होवून त्यातून रक्त निघाले तसेच वरील आरोपीतांनी फिर्यादीस चापटा बुक्यांनी मारहाण केली तसेच फिर्यीदीचा पुतण्या रोशन तायडे ,क्रिष्णा तायडे असे सदर भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील आरोपीतांनी मारहाण करून शिवीगाळ करून धमकी दिली . तसेच पंकज निवृत्ती तायडे , रविंद्र आनंदा मोरे अशांनी फिर्यादीचा पुतण्या कैलास अशोक तायडे यांचे कुलूपबंद घराचे दार तोडून आत मध्ये प्रवेश करुन पेट्रोल टाकून घरातील साहित्य जाळून त्याचे नुकसान केले अशी फिर्याद दिली आहे.त्यामुळे भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये भाग ५ गुन्हा रजिस्टर नंबर ९८/२०२३ भादवि कलम ४३६,४२७,३२४,४५२,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे . घटना समजताच तात्काळ भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार , सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून घटनास्थळी तळ ठोकून होते. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार व पोलीस कर्मचारी करीत आहेत.

Spread the love