भुसावळ – महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एन जी पी ४५११ भुसावळ तालुका यांची नुकतीच पंचायत समिती च्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात प्रथम सभा आयोजित केली असता युनियन सभासदांनी भुसावळ तालुक्यातील पंकज चौधरी सन २०१६/१७ , गणेश सुरडकर सन २०१५/१६, हिरासिंग राठोड सन २०१७/१८ या वर्षी चा आदर्श ग्रामसेवक पुरक्रार मिळाला त्या मुळे त्यांचा सत्कार केला त्या वेळी ग्रामसेवक जिल्हा महासंघ कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रशांत तायडे ,जिल्हा उपाध्यक्ष अशोक खैरनार,जिल्हा सचिव गौतम वाडे,भामरे बापू, सचिन हिवरकर उपस्थित होते.
त्याच प्रमाणे जिल्हा ग्रामसेवक युनियन तर्फे चेतन एकनाथ खाचणे, अध्यक्ष,म.रा.ग्रा.पं.क.युनियन,भुसावळ यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार केला.त्यावेळी सतीश पाटील जिल्हा अध्यक्ष म.रा.ग्रा.पं.क.युनियन, उपाध्यक्ष सचिन शिरोळे,सचिव अरुण चौधरी,सुभाष कोळी मार्गदर्शक तथा अध्यक्ष चोपडा तालुका,अनंता पाटील संघटक, व सदस्य आकाश भैसे , भागवत कोलते, सुनील पाटील , अनिल तळेले कार्याकारणी चे सदस्य उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.