भुसावळ येथील चंद्रकांत चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ अध्यक्षपदी बिनविरोध निवड …..

0
50

महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ साठी ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी यांची सर्वानुमाते बिनविरोध निवड करण्यात आली..महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ चे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत चौधरी….

महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या लोकसेवकांच्या निवडणुकीत चंद्रकांत चौधरी भुसावल यांची बिनविरोध निवड तमाम महाराष्ट्रातील गांधी जणांनी केली. निवडणूक अधिकारी मोहन भाऊ खैरकर यांच्या शिस्तबद्ध निवडणूक कार्यक्रमात महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातून किमान 160 पेक्षा अधिक सर्वोदया चे पदाधिकारी, लोकसेवक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रकांत चौधरी याची महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाच्या अध्यक्ष पदी निवड करताना कुठलाही प्रकारचा आक्षेप किंवा मतभेद दिसून आला नाही. या आदर्श निवडणुकीमध्ये सर्व पदाधिकारी, लोक सेवक, आणि कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रातून अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यासाठी भुसावळ माळी लॉन येथे उपस्थित होते .बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली.

मालेगाव जिल्हा नाशिक येथील कार्यकारिणीत झालेल्या बैठकीत मोहन भाऊ खैरकार याची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक कार्यकारी मंडळाने केल्यावर अगदी शिस्तबद्ध चोख पणे आपली जबाबदारी सांभाळताना एक आदर्श निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली .अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष आबा कांबळे, शंकर बगाडे, उपाध्यक्ष ज्ञानोबा मुंडे यांनी दिली.चंद्रकांत चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर चंद्रकांत चौधरी व त्यांच्या अर्धांगिनी सिमा चंद्रकांत चौधरी दोघांचा सहकुटुंब सत्कार केला गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील जळगाव यांनी केले. प्रवीण राऊत, नितेश पाटील, बाबा खैरकर, कविवर्य शाम खेडकर, शेतकरी पुढारी दामू पंत उघडे ,डॉ प्रमोद टाले अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी यासाठी सहकार्य केले. अविनाश सोमनाथ यांनी सर्वांचे आभार मानले.

सर्वोदय मंडळांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया आदर्श रीतीने पहिल्यांदाच पार पडल्याचा आनंद सर्वांनी व्यक्त केला .आणि कार्यकारणीची बैठक लगेच ठरवल्या बद्दल प्रस्ताव मांडला गेला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमंती करून पुढील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असे नूतन अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले.. उपरोक्त निवडिचे लोकसेवक प्रा जगदिश पाटील, संजीव शिरसाठ, देवसिंग पावरा,गनदास बारेला,बालसिंग बारेला यांनी अभिनंदन केले.

Spread the love