भुसावळात विजेचा धक्का लागून बांधकाम मजुराचा मृत्यू

0
34

भुसावळ : शहरातील आगाखान वाडा येथे घराचे बांधकाम करणाऱ्या मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील आगाखान वाडा येथे अब्दुल सलाम शेख यांच्या घराचा बांधकाम ठेका नुरुउद्दीन शेख अलाउद्दीन शेख यांनी घेतलेला असून, बांधकामावर पाणी मारण्याचे काम इक्बाल सुपडू पिंजारी (वय २२) करीत असे. गुरुवारी (ता. २) सकाळी सव्वाआठच्या सुमारास नेहमीप्रमाणे इक्बाल सुपडू पिंजारी हा बांधकामावर पाणी मारायला गेला असता पाणी मारताना विजेचा धक्का लागून तो खाली पडला. त्याला घरमालक अब्दुल शेख यांनी भुसावळ येथील ट्रामा सेंटर येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. मृत इक्बाल पिंजारी हा यावल तालुक्यातील रहिवासी होता. मोलमजुरी करण्यासाठी तो भुसावळ येथे आलेला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Spread the love