प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: भुसावळ – भादली स्टेशन कडून भुसावळ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या डाऊन रेल्वे रुळावर दि.२८ नोव्हेंबर रोजी ३ वाजेच्या सुमारास अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला आहे.या बाबत सरस्वती नगर मधील रेल्वे कर्मचारी शुभमकुमार शंभुप्रसाद यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीसांना माहिती दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताचे वर्णन पुढील प्रमाणे अंगाने सडपातळ, अंगात पिवळ्या रंगाचे फुल बाहीचा शर्ट ,त्यावर काळे ठिपके असलेला व आकाशी रंगाची जिन्स पॅन्ट, उजव्या हाताच्या मनगटावर जयसेतू , मंदीराचे चिन्ह , संदिप, माँ असे गोंदलेले आहे. तसेच लव च्या चिन्हात S व A गोंदलेले, हातामध्ये लाल रंगाचा दोरा बांधलेला असून अंदाजे ३० ते ३५ वर्ष वय आहे.या तरुणास मालगाडीने धडक दिल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला असून ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.