प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे की कर्तव्यावर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप प्रल्हाद बडगे ( वय ४० ) नेमणूक भुसावळ तालुका पोलीस स्टेशन यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की दि.२३/३/२०२६ रोजी सकाळी १०:१५ वाजता मौजे साकरी गावातील किन्ही रोड वरील खोकली माता मंदिरा जवळ आरोपी प्रविण जयराम बाविस्कर , दिनेश जयराम बाविस्कर,मोहन जयराम बाविस्कर, विकास कौतिक काकडे,सागर प्रभाकर सोनवणे,संजू आत्माराम तोंडे , माधुरी प्रविण बाविस्कर ,सुरेखा मोहन बाविस्कर ( सर्व रा. साकरी ता भुसावळ ) हे एका मुलास लाकडी दांडा व फावड्याचा वापर करून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असून त्या मुलाला त्याच्या ताब्यातून सुटका करण्यासाठी फिर्यादी व साक्षीदार हे गेले असता यातील आरोपी यांनी फिर्यादीच्या अंगावर धावून आले व त्यांना धक्काबुक्की करून त्यांचा शर्ट पकडून ओढून शर्टचे बटन तोडले त्या वेळेस फिर्यादीस हाताने मारहाण केली आहे.फिर्यादी हे त्याचे शासकीय कर्तव्य करीत असतात त्याच्या शासकीय कर्तव्यात अडथळा करुन शासकिय कर्तव्य करु दिले नाही.म्हणून गुरनं ००६५/२०२६ BNS कलम १३१ ,१२१(१),३२४(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड साहेब करीत आहेत.








