प्रतिनिधी- जितेंद्र काटे
भुसावळ -: येथील तालुका पोलीस स्टेशन ला जिल्हा पोलीस अधीक्षक डाँ.महेश्वर रेड्डी साहेब यांनी वार्षिक तपासणी च्या अनुषंगाने भेट दिली यावेळी हद्दीतील पोलीस पाटील यांची मिटिंग घेऊन गावातील समस्या ची विचारपूस केली तसेच गावागावातील वादग्रस्त मुद्दे असल्यास चर्चा केली. पोलीस स्टेशन ची रेकॉर्ड तपासणी, मुद्देमाल, गोपनीय, गाववारी तपासणी, गंभीर गुन्ह्याचा आढावा घेतला, पोलीस अंमलदार यांचा दरबार घेऊन समस्या जाणून घेतल्या, तसेच पोलीस कर्मचारी यांची हिंम्मत वाढवण्यासाठी तसेच कोणत्याही कर्मचारी यांची काही समस्या असल्यास कळविण्याचे आवाहन केले .यावेळी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन च्या कामा बद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी भुसावळ विभागाचे पोलीस उप अधिक्षक श्री गावित साहेब , पो. नि. महेश गायकवाड , पोउनि पुजा अंधारे , पोउनि संजय कंखरे सर्व एएसआय , ठाणे अंमलदार , पोहेकाँ ,पो. काँ. व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोनि.महेश गायकवाड यांनी पोलीस अधीक्षक यांचा सत्कार केला.












