प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: येथील तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या श्री गुरुदत्त मंदीरात दत्तजयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे वस्रोद्योग मंत्री ना.संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस उप अधिक्षक संदीप गावीत साहेब, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड साहेब तसेच परिसरातील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, पोलीस पाटील व परिसरातील गावांमधील पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.












