भुसावळ – महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या तालुका निहाय पुनर्निवड बैठकांची घोडदौड सुरूच आहे. सोमवार दि. ११ रोजी जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतपेढी भुसावळ येथील बैठकीत राज्य कार्यकारणी सदस्य कुणाल पवार, विनायक चौथे, बिपिन पाटील, संदीप पाटील, मुजबीर रहमान, राकेश पाटील, नाना पाटील यांच्या उपस्थितीत भुसावळ कार्यकारिणीची तसेच दोन जिल्हा कार्यकारणी सदस्यांची निवड करण्यात आली.
भुसावळ कार्यकारणी:
राहुल नारायण पाटील (तालुकाध्यक्ष), अश्विन इंगळे (उपाध्यक्ष), वैशाली मुरलीधर महाजन (महिला उपाध्यक्ष ), विजय पंढरी नेहते (सचिव), श्रीमती प्रीती ललित फेगडे (सहसचिव), जी बी पाटील (कोषाध्यक्ष), राधेश्याम परदेशी (सह कोषाध्यक्ष), विनोद ताथोड (आरोग्य विभाग प्रमुख), अमित चौधरी (कार्याध्यक्ष), मनीषा देशमुख (कायदेशीर सल्लागार), निलांबरी झांबरे (महिला सदस्या ), जगदीश पाटील (प्रसिद्धीप्रमुख), कार्यकारणी सदस्य एस के चौधरी, प्रभाकर राऊत, दीपक आमोदकर, दीपक महाजन, हेमंत चौधरी, देवेंद्र वाघुळदे, सी के तायडे, निलेश नेहते, शरद पितांबर तायडे, रुपेश मेश्राम, प्रदीप पाटील, भूषण झोपे, वैशाली सुतार. यांची निवड करण्यात आली.
जिल्हा कार्यकारणी:
भुसावळ तालुक्यातून टी एम करणकाळ व योगेश सुभाष गांधले या दोन सदस्यांची जिल्हा कार्यकारणी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना तालुका निहाय पुनर्निवड बैठकांची घोडदौड सुरुच…
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या तालुका पुनर्गठन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील १० तालुके गठीत झाले आहेत. २००५ नंतर नियुक्त सरकारी, निमसरकारी कर्मचारी यांची सर्व विभाग व सर्वसामावेशक कार्यकारण्या गठीत होत आहेत. त्या माध्यमातून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जळगाव, धरणगाव, चोपडा, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, एरंडोल, धरणगाव इत्यादी तालुक्यात पुनर्निवड झाली आहे. लवकरच उर्वरित तालुक्यात बैठका होऊन पुनर्निवड होईल. आणि लोकशाही मार्गाने नवीन जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारणी निवड होईल. आणि आवश्यकता पडल्यास भविष्यात जुनी पेंशन मिळविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन होऊ शकतात. बैठकीत अशा चर्चेला उधाण आले होते.