प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील वरणगाव नजिक असलेल्या सुसरी येथील शेतकरी तुकाराम शामराव तळेले यांच्या शेतात काम करीत असताना दि.२६ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास आकाशात विजांचा गडगडाट सुरू असताना ममता विनोद पाटील व मिनाक्षी रविंद्र तळेले यांच्या अंगावर विज पडल्याने दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मयतांना वरणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. या बाबत तलाठी यांनी पंचनामा करून अहवाल तहसीलदार यांच्याकडे पाठवीला आहे.