भुसावळात नकली चलनी नोटा प्रकरणी ५० हजाराच्या नोटा जप्त !

0
14

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – येथे भारतीय चलनाच्या तीन लाख रुपयांच्या नकली नोटा बाळगणाऱ्यख तिघांना भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी अटक केली आहे. या बाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दि.४/९/२०२४ रोजी रात्री ८:४० वाजता सैय्यद मुशायद अली मुमताज अली रा उस्मानिया पार्क,शिवाजी नगर जळगाव हा त्याचा साथीदार नदीम खान रहिम खान रा. सुभाष चौक , शनी पेठ १० नंबर शाळे जवळ जळगाव हा त्याच्या जवळ ३०००००/- रुपये किंमतीच्या ५०० रुपये च्या ६०० भारतीय चलनाच्या नकली नोटा बाळगून त्यांच्या ताब्यातील होंडा कंपनीची ड्रिम युमा मोटरसायकल क्रमांक एम एच १९ सीडी ५४०३ हिच्यावर वाहतूक करुन वितरीत करण्यासाठी भुसावळ शहरात येणार असल्याची गुप्त माहिती पो नि राहुल वाघ यांना मिळाली होती.त्यानुसार त्यांनी बाजार पेठ पोलीसांच्या डि. बी. पथकाचा सापळा रचला असता अब्दुल हमीद कागल रा. रसलपूर रोड अब्दुल हमीद चौक रावेर हा सदरच्या बनावटी चलनी नोटा विकत घेताना मिळून आला त्यामुळे वरील तिघां विरुध्द भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात सीसीटीएन एस गुन्हा रजि. नं ३५६/२०२४ भा.न्या. सं.क्र.१७९,१८०,३(५) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. या बाबत सखोल चौकशी करण्यात येत असून सदरच्या नोटा घेण्यासाठी आरोपी राहुल राजेंद्र काबरा रा.चिखलदरा ता जि. संभाजी नगर याचे सोबत सुमारे दोन महिन्यापुर्वी बऱ्हाणपुर येथे गेला होता व आरोपी नामे प्रतिक नवलखे रा. मालविया वार्ड बऱ्हाणपूर याचे कडून सदरच्या बनावट नोटा घेण्यात आल्याचे समजते तसेच आरोपी प्रतिक नवलखे हाच बनावट नोटा छापतो आणि व्यवहार करतो असे सैयद मुशायद अली ममुताज अली याने सांगीतले आहे.

तर अब्दुल हमीद कादर याने सांगीतले की मी घरी पन्नास हजार रुपयांच्या बनावट नोटा लपवून ठेवल्या आहेत.त्याच्या घरातून नोटा जप्त करण्यात आल्या आहेत तर गुन्हा घडल्या पासून राजेंद्र काबरा व प्रतिक नवलखे फरार आहेत.

Spread the love