भुसावळात लाखोच्या नकली चलनी नोटा प्रकरणी तिघांना पोलीसांकडून अटक !

0
12

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – येथे भारतीय चलनाच्या तीन लाख रुपयांच्या नकली नोटा बाळगणाऱ्यख तिघांना भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी अटक केली आहे.

या बाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दि.४/९/२०२४ रोजी रात्री ८:४० वाजता सैय्यद मुशायद अली मुमताज अली रा उस्मानिया पार्क,शिवाजी नगर जळगाव हा त्याचा साथीदार नदीम खान रहिम खान रा. सुभाष चौक, शनी पेठ १० नंबर शाळे जवळ जळगाव हा त्याच्या जवळ ३०००००/- रुपये किंमतीच्या ५०० रुपये च्या ६०० भारतीय चलनाच्या नकली नोटा बाळगून त्यांच्या ताब्यातील होंडा कंपनीची ड्रिम युमा मोटरसायकल क्रमांक एम एच १९ सीडी ५४०३ हिच्यावर वाहतूक करुन वितरीत करण्यासाठी भुसावळ शहरात येणार असल्याची गुप्त माहिती पो नि राहुल वाघ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बाजार पेठ पोलीसांच्या डि. बी. पथकाचा सापळा रचला असता अब्दुल हमीद कागल रा. रसलपूर रोड अब्दुल हमीद चौक रावेर हा सदरच्या बनावटी चलनी नोटा विकत घेताना मिळून आला त्यामुळे वरील तिघां विरुध्द भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात सीसीटीएन एस गुन्हा रजि. नं ३५६/२०२४ भा. न्या. सं. क्र.१७९,१८०,३(५) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

वरील आरोपी पैकी सैय्यद मुशायीद अली ममुताज अली रा. उस्मानिया पार्क जळगाव याच्या विरुध्द वरणगाव ता भुसावळ येथील पो स्टे मध्ये १३८/२०२३ ला गुन्हा दाखल आहे तर अब्दुल हमीद अब्दुल कादर रा. रावेर याच्या विरुध्द एम आय डी सी पोलीस स्टेशन (१), जिल्हा पेठ पोलीस स्टेशन(१), जळगाव शहर पोलीस स्टेशन (२) व मलकापूर जि.बुलढाणा (१) असे पाच गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,भुसावळ उपविभागीय अधिकारी कृष्णांत पिंगळे, बाजार पेठ चे पोनि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनि राजू सांगळे, पोहेकाँ विजय नेरकर, निलेश चौधरी, पोकाँ प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर आढाळे, दिलीप कोल्हे, राहुल वानखेडे, भुषण चौधरी अशांनी केली असून वरील आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोऊनि राजू सांगळे करीत आहेत.

Spread the love