भुसावळात गुन्ह्यांचे सत्र सुरुच व्यापाऱ्यावर धारदार शस्त्राने वार

0
13

भुसावळ – : भुसावळ सातत्याने गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असतांना काल दिनांक ७ रोजी रात्री एका व्यापाऱ्यावर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील रेणुका माता मंदिराच्या पाठीमागे सायंकाळी ०८:०० वाजेच्या सुमारास मोटरसायकलने गोडावून वरून येत असतांना काही अज्ञात इसमांची मोटरसायकल वर येऊन बाबा फोमचे संचालक नवीन किशोर कुकरेजा ( वय ३० राहणार सिंधी कॉलनी भुसावळ ) यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली असून जखमीवर येथील खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे , बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत , सपोनि हरीष भोये , पोना.रविंद्र बिहाडे , पोकॉ योगेश महाजन यांनी भेट असून तपास सुरू केला आहे.

Spread the love