भुसावळात फळ विक्रेत्यांच्या गोडाऊनला आग , ६० लाखाचे नुकसान ?

0
38

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – येथील डेली मार्केट मध्ये असलेल्या फळ विक्रेत्यांच्या गोडाऊनला दि.२५ रोजी सकाळी अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली मात्र दोन तीन तासांच्या अथक परिश्रमा नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असल्याचे समजते.

येथे डेली मार्केट मध्ये फळ व्यापारी वर्गाचे अडत दुकाने आहेत या दुकानांमध्ये व्यापारी आपला माल गोळा करून ठेवतात.मात्र अचानक आग लागल्याचे समजताच फळ व्यापारी यांनी धाव घेतली. भगवान चौधरी, निलेश माळी,किरण महाजन, नरेंद्र चौधरी, युनूस बागवान,फारुख बागवान,इकबाल बागवान, आरीफ बागवान, आसिफ बिस्मिल्ला, बबलू बाविस्कर, किरण भोई या भाजीपाला व फळे विक्रेत्यांच्या गोडाऊनचे नुकसान झाले आहे अंदाजे साठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. या नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे. मात्र आग नेमकी कशामुळे लागली या बाबत कारण समजू शकलेले नाही.

Spread the love