मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; बळीराजाला मिळणार दिलासा

0
44

आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयानुसार मागील वर्षी पावसाळ्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता सुधारित दरानं मदत मिळणार आहे.

मागील पावसाळ्यात नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते, या शेतकऱ्यांसाठी आता नवीन सुधारित दराने मदत मिळणार आहे, त्यासाठी पंधराशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील पावसाळ्यात नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते, या शेतकऱ्यांसाठी आता नवीन सुधारित दराने मदत मिळणार आहे. नवीन सुधारित दराप्रमाणे जिरायत जमिनीसाठी 8 हजार पाचशे तर बागायत जमिनीसाठी 17 हजार रुपयांप्रमाणे मदत मिळणार आहे.

यासाठी दीड हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना फटका गेल्यावर्षी अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजरी, कापूस यासारख्या पिकांना मोठा फटका बसला. तर रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू हारभारा यासारखी पिकं हातची गेली, केळी आणि द्राक्ष बागाचं देखील मोठं नुकसान झालं.

Spread the love