मोठी बातमी! शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?

0
29

महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी असून राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती आहे.

यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही दोन गट पडले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नाव आणि पक्षचिन्ह कोणाला मिळते याकडे लक्ष लागून होते. मात्र काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिला होता. यामुळे शरद गटाला मोठा धक्का मानला जात होता.

सध्या देशात सध्या निवडणुकीचा माहोल आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलवली आहे. राज्यात सध्या ज्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलवली आहे. बैठकीत राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा सुरू आहे. या शिवाय शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन करण्यातबाबत चर्चा सुरु आहे, अशी माहिती आहे.

Spread the love