रावेर प्रतिनिधी– राजेंद्र महाले— रावेर तालुक्यातील चिनावल- वडगांव शिवारातील शेतकर्यांची केळी खोडे कापल्याने मोठा वाघोदा येथील रावेर अंकलेश्वर महामार्गावर परिसरातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले
शेतकरी आंदोलनास्थळी ग्रामविकासमंत्री मा.ना.गिरीष महाजन यांनी भेट देऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची कैफियत जाणून घेतली वारंवार रावेर तालुक्यातील अनेक गावांत केळी खोड कापून शेतकऱ्यांचे नुकसान करण्याच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि शेतकरयांच्या उभ्या पिकांचे नुकसान केले जात आहे पोलिस प्रशासनाने आंदोलन स्थळीं अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे सावदा पोलिस स्टेशनचे एपीआय जालिंदर पळे, पीएसआय अन्वर तडवी फैजपूर चे एपीआय सिध्देश्वर आखेगांवकर निंभोरा पोस्टेचे एपीआय गणेश धुमाळ रावेर पोलिस निरीक्षक कैलास नागरे एपीआय शितलकुमार नाईक पोलिस कर्मचारी तीन दंगा नियंत्रक पथकासह लक्ष ठेवून होते.