प्रतिनिधी ( जितेंद्र काटे ) -भुसावळ – येथून जवळच असलेल्या साकेगाव येथे अनैतिक संबंधातून एका तरुणाने चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे.
या बाबत भुसावळ तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी विनोद सुभाष कुंभार रा. भवानी नगर साकेगाव यांनी दि.२६/९/२०२४ सकाळी ५ वाजता फिर्याद दिली की दि.२५/९/२०२४ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास सोनाली महेंद्र कोळी ला संशयीत आरोपी सागर रमेश कोळी हा जोरजोरात शिविगाळ व आरोड्या मारत सोनाली कोळी च्या पाठीवर , पोटाच्या बाजूला तसेच सोनाली कोळी ला वाचविण्यासाठी गेलो असता तू आमच्या मध्ये पडू नको असे म्हणत फिर्यादीच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत केली तसेच मारुन टाकण्याची धमकी दिली अशी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला २०५/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१),३५२,३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटना स्थळी वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली असून भुसावळ उपविभागीय पोलीस अधीक्षक कृष्णांत पिंगळे व तालुका पो.नि.महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जनार्दन खंडेराव पुढील तपास करीत असून आरोपी सागर रमेश कोळी रा.भवानी नगर साकेगाव याला पोलीसांनी अटक केली असून सदर खूनाची घटना अनैतिक संबंधातून घडल्याची चर्चा आहे