बोदवड येथील वक्तव्यावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली दिलगीरी व्यक्त

0
52

जळगाव-:बोदवड येथील एका कार्यक्रमात मी रस्त्यांबाबत वक्तव्य केले होते. चांगले रस्ते असावेत अशी अपेक्षा त्यामागे होती. परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर आहे. तसेच महिलांविषयीही आपल्या मनात नेहमी आदराचीच भावना होती, आजही आहे आणि यापुढेही राहील असेही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

Spread the love