बोगस शिक्षक भरती प्रकरणी किशोर सोनवणे यांचे अमरण उपोषण 

0
59

खालील शिक्षण संस्थांनमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणामध्ये शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता

जळगाव – : बोगस शिक्षक भरती प्रकरणी जिल्हा परिषद कार्यालय समोर साप्ताहिक भ्रष्ट्राचार न्युज पेपरचे संपादक किशोर अरुण सोनवणे यांनी दिनांक 17 मार्च पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.                                                                                    किशोर सोनवणे यांनी जळगाव संदेशला दिलेल्या माहिती नुसार आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुल चाळीसगाव,आनंदीबाई बंकट मुलीचे हायस्कुल चाळीसगाव तुळजाई शिक्षण मंडळ पाचोरा अंतर्गत सर्व माध्यमिक शाळा,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिपंळगाव-बाबंरूड बुद्रुक तालुका भडगाव जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर ,माध्यमिक विद्यालय टाकरखेडा ता. अमळनेर संत तुलसी विद्या प्रसारक मंडळ जळगाव अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा व वा संस्थेत बोगस बैंक, डेट शिक्षक व शिक्षकेतर भरती करूण घेण्यात आली आहे.

शासन नियमांची पायमल्ली करून शिक्षण विभागातील काही भ्रष्ट कर्मचारी यांना पैशाची देवाण घेवाण करून जिल्ह्यातील काही एजंट यांच्या मध्यस्थीने बोगस पटसंख्या, बनावट संच मान्यता, सुची यात मोठी फेरफार करून पवित्र पोर्टलवर जाहीरात न देता अणि टी ई टी सर्टीफिकेटची कोणतीही पडताळणी न करता हि बोगस भरती केलेली असल्याची माहिती मला प्राप्त झालेली आहे. या मुळे आपल्या कार्यालयाने या संस्थांना एक प्रकारे मदतच केली आहे अशी चर्चा परिसरात आहे तरी आपण शासनाचे एक जबाबदार अधिकारी म्हणून या संस्थांची व शाळांची चौकशी करून त्यांना शासनाची फसवणुक करण्यापासून रोखावे तसेच त्या संस्थांची, शाळाची चौकशी करून सत्यता बाहेर येईल तो पर्यंत कोणतेही वेतन देण्यात येवू नये अन्यथा या पुढे होणाऱ्या नुकसान भरपाईची संपुर्ण जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील आपण लवकरात लवकर या संस्थांची व शाळेची सन 2012 ते आज पर्यंत भरती केलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मान्यता आदेश त्या वेळेस नियुक्ती असलेले शिक्षणाधिकारी यांच्या सहीची पडताळणी करूण त्या वेळच्या संच मान्यता, सुची, पटसंख्या सर्व प्रस्ताव यांचे आवक जावक शालार्थ आयडी, टीईटी, सर्टीफिकेट बिंदू नामवली यांची कागदोपत्री सखोल चौकशी करावी आणी सत्यता जनते समोर आणून यात दोषी असणाऱ्या सर्वच्या सर्व संस्थेचे पदाधिकारी, मुख्यध्यापक यांचे वर कायदेशिर कारवाई करावी व त्याच प्रमाणे वेतन अधिक्षक यांच्या विभागाने सन 2012 पासून ते आज पर्यंत एकुण किती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मागील फरकबील रक्कम दिलेली आहे.त्याची सखोल चौकशी करावी, बोगस फरकबील काढून देण्यात सहभागी असणाऱ्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे.

Spread the love