दोन महिन्याच्या बाळाला झोळीत झोपवून आई लागली कामाला; क्षणात जे घडले ते भयावह

0
50

आपल्या दोन महिन्याच्या चिमुकल्याला घेऊन आई शेतात काम करण्यासाठी गेली होती. दोन महिन्याचे बाळ रडत असल्याने त्याला झोपविण्यासाठी आई आली. या बाळाला झोळीत टाकून आई पुन्हा कामाला लागली.

मात्र याठिकाणी आलेल्या भटक्या कुत्र्यांनी बाळाला झोळीतून ओढत नेत गंभीर चावे घेतल्याने सदर बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यात घडली आहे.

खरगोन जिल्ह्यातील अनिल सालम भिलाला हे परिवारासोबत काममिनित्ताने रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे आला आहे. अनिल भिलाला हे शेतमजुरी करण्यासाठी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून राजू गुप्ता यांच्या शेतात आले आहेत. त्यांना श्याम आणि आशिया (वय ५) आणि दिव्या (वय २ महिने) मुले आहेत. दरम्यान ७ मार्चला सकाळी अनिल भिलाला आणि त्यांची पत्नी मीना असे शेतात काम करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी शेतमालक आणि गावातील काही मजूर काम करीत होते.

दरम्यान भिलाला यांची २ महिन्यांची मुलगी दिव्या हिला झोप लागत असल्याने तिला झाडाला झोका बांधून झोक्यामध्ये झोपवले होते. त्यानंतर दिव्याची आई- वडील हे शेतात काम करत होते. याच वेळी त्यांना चार ते पाच कुत्रे शेतात पळत असताना दिसले. हे कुत्रे जेवणाच्या डब्याकडे जात आहे असे मजुरांना वाटले. त्यावेळी अनिल भिलाला हे कुत्र्यांच्या मागे पळाले असताना त्यांना झोक्यात झोपवलेल्या बाळाला कुत्रे ओढून नेत असल्याचे निदर्शनास आले.

दिव्याला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले. मात्र कुत्र्यांच्या हल्ल्यात दिव्याला जखमा झाल्या होत्या. तिला लागलीच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दिव्याची तब्येत अधिक बिघडल्याने तिला जळगावला शासकीय रुग्णालयात नेण्याने सांगण्यात आले. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिव्याला तपासून मृत घोषित केले. कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Spread the love