दोन वर्षांनंतर जळगावात प्रदीप मिश्रांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन; कधी आणि कुठे होणार?

0
58

जळगाव -: दोन वर्षांनंतर जळगावात सिहोरवाले प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ४ ते १० ऑक्टोबर या कालावधीत ही कथा होणार असून त्यासाठी त्यासाठी ३०० एकरवर भव्य डोम व पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती जळगाव शिवमहापुराण कथा सेवा समिती व आयोजक समाजसेविका ममता बोढरे-माळी यांनी दिली.

कथेसाठी पहिल्याच दिवशी १० ते १२ लाख भाविक उपस्थित राहणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान २० जुलैला सकाळी ११ वाजता तरसोद येथील गणपती मंदिरात बैठकीचे आयोजन जळगाव शिवमहापुराण कथा सेवा समितीने केले आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवक, हिंदू संघटना यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.

जळगाव तालुक्यातील जटाधारी महादेव वडनगरी येथे दोन वर्षांपूर्वी शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. नंतर चाळीसगाव येथे कथा पार पडली होती. त्यानंतर आता दोन वर्षानंतर जळगावकरांना कथेचा लाभ घेता येणार आहे. या कथेचे नियोजन सुरू असून जिल्हाभर आयोजन समित्या
स्थापन करण्यात येत आहे.

सिहारवाले प्रदीप मिश्रा यांच्या कथेचे स्थळ जळगाव शहराच्या जवळच निश्चित केले जाणार असल्यामुळे त्यांचा मुक्काम शहरातील एका नवीन बांधलेल्या वास्तूत होणार आहे. तर कथेसाठी येणाऱ्या बाहेरील राज्यातील भाविकांची निवास, भोजन व वाहन पाकींगची व्यवस्था करण्यासाठी समित्या तयार केल्या जाताहेत.
रम्यान, कथेच्या निमित्ताने शहरात कावड यात्रा निघणार आहे. ही कावड यात्रा कालिंका माता मंदिर ते शंकररावनगरातील कुंदकेश्वर मंदिरापर्यंत एक किलोमीटर असणार आहे. हे कावड यात्रेचे हे दुसरे वर्ष आहे.

२४ तास भोजन व्यवस्था
कथास्थळाच्या परिसरात २४ तास भाविकांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज ५ लाख भाविक जेवण करतील असे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी स्वतंत्र समिती तयार करण्यात येणार असून तीया व्यवस्थेचे काम पाहील.

Spread the love