एका तरूणाने सोशल मीडियावर बॉर्नविटाबाबतचा एक मिनीटाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमुळे खळबळ उडाली असून कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. व्हिडीओ पाहून कंपनीवर लोकं प्रचंड भडकली असून बॉयकॉट बॉर्नविटा अशी मागणी होऊ लागली आहे. मात्र कंपनीने त्या तरूणाला कायदेशीर नोटीस बजावली. ज्यानंतर त्याला आपली पोस्ट हटवावी लागली.
सोशल मीडिया इ्फ्ल्युएन्सर रेवंत हिमतसिंहकामे एक व्हिडीओ शेअर करत बॉर्नविटाच्या गोडपणाबाबत प्रश्न विचारला होता. त्याने सांगितले होते की, बॉर्नविटामध्ये जास्त प्रमाणात साखर आहे. त्यामध्ये कोको सॉलिड्स आणि कर्करोग निर्माण करणारे घटक आहेत. जे मुलांसाठी हानिकारक आहेत. रेवंत हा एक न्यूट्रीशनिस्ट आणि आरोग्य प्रशिक्षकही आहे. रेवंतचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. खरंतर बॉर्नविटा मुलांच्या आरोग्यासाठी चांगले ड्रींक म्हणून मार्केटींग केली जाते. लोकांनी आता कंपनीवर प्रश्न विचारायला सुरूवात केली आहे., ब़ॉर्नविटाबाबत वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या आहेत. ज्यानंतर कंपनीने रेवंतविरूद्ध कायदेशीर नोटीस जारी केली आहे. त्यानंतर त्याने तो व्हिडीओ डिलीट केले आहे. मात्र रेवंतने पोस्ट केलेल्या या व्हिडीओला 12 मिलीअन ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला अभिनेता परेश रावल आणि माजी क्रिकेटर किर्ती आजादने शेअर केला आहे.
कंपनीने रेवंतला याबाबत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यावर आता रेवंतने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहीलीय, ’13 एप्रिल 2023 रोजी हिंदुस्थानातील सर्वात मोठ्या लॉ फर्मपैकी एकाकडून कायदेशीर नोटीस मिळाल्याने मी सर्व प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओ काढून टाकत आहे. व्हिडिओ बनवल्याबद्दल मी कॅडबरीची माफी मागतो. माझा कोणत्याही कंपनीची बदनामी करण्याचा उद्देश नव्हता. तसेच मला कोणत्याही कायदेशीर प्रकरणात पाठपुरावा करण्यासाठी स्वारस्य नाही. मी त्या कंपनीला विनंती करतो की, याला कायदेशीर पद्धतीने वाढवू नका. तर कंपनीने आपली बाजू मांडताना सांगितले की, रेवंतने केलेल्या दाव्यांमध्ये काही तथ्य नाही. त्याने खोटे निष्कर्ष काढले आहेत’. सात दशकांहून अधिक काळापासून ग्राहकांचे प्रेम मिळत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. बॉर्नविटामध्ये व्हिटॅमिन ए, सी, डी, आयर्न, झिंक, कॉपर आणि सेलेनियम सारखे पोषक घटक असतात, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
कंपनीच्या प्रवक्त्याने माहिती देताना सांगितले की, बॉर्नविटाची रचना पोषणतज्ञ आणि अन्न शास्त्रज्ञांच्या टीमने स्वाद आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य पद्धतीने तयार केले आहे. पुढे कंपनीने सांगितले की, ‘आमचे सर्व दावे पारदर्शक आहेत आणि सर्व घटकांना नियामक मान्यता मिळाली आहे. ग्राहकांना पोषणाची माहिती देण्यासाठी सर्व आवश्यक पौष्टिक माहिती पॅकवर देण्यात आली आहे. या व्हिडिओने बॉर्नविटासारख्या ब्रँडवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे कायदेशीर नोटीसमागील कारण सांगण्यात आले आहे.











