लाडक्या बहिणींची चिंता वाढली, ३० लाख महिलांना ₹१५०० मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

0
9

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता ३००० रुपयांचा हप्ता एकत्र मिळणार आहे.

मकर संक्रांतीला लाडक्या बहि‍णींना डबल खुशखबर मिळणार आहे. ३००० रुपये एकत्र येणार असल्याने महिलांना खूप आनंद झाला आहे. याचसोबत आता लाखो महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे. यामागचे कारण काय ते जाणून घ्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. कोट्यवधी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यातील काही महिलांनी केवायसी केली आहे. राज्यातील जवळपास ३० लाख महिलांनी केवायसी न केल्याची माहिती आता समोर आली आहे. यामुळे या लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यामुळे महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी अनेक निकष ठरवून देण्यात आले आहेत. यामध्ये महिलांच्या पतीची आणि वडिलांची केवायसी करणे अनिवार्य आहे. या केवायसीमध्ये जर महिलांच्या पतीचे किंवा वडिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असल्याचे आढळले तर त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे. याचसोबत ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे.

Spread the love