मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकावल्याचं प्रकरण समोर आले होते.
ज्यामुे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानी हिला अटक करण्यात आली होती. तर यामधील मुख्य आरोपी बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईच्या मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार केली होती की, अनिक्षाने तिला एक कोटी रुपयांची लाच देऊ केली होती. अनिल जयसिंघानी यांच्यावरील खटला निकाली काढण्यासाठी ही ऑफर देण्यात आली होती, असा खुलासा करण्यात आला होता.
या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून डिझायनर अनिक्षा जयसिंघानी आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी यांच्यासंदर्भात अनेक धक्कादायक माहिती समोर आल्या आहे
कोण आहे अनिल जयसिंघानी…
अनिल जयसिंघानी हा क्रिकेट बुकी आहे. 5 राज्यात 17 गुन्हे त्याच्या नावावर दाखल आहेत. गेल्या 8 वर्षांपासून तो फरार आहे. सट्टेबाजी प्रकरणात अनिल जयसिंहानीला तीन वेळा अटक करण्यात आली आहे. इतकंच नाही तर गोवा पोलिसांनी 11 मे 2019 रोजी अनिल जयसिंघानी याच्याविरोधात लुकआऊट नोटीसही जारी केली होती. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार आठ वर्षांपूर्वी 2015 मे मध्ये गुजरात ईडीने जयसिंहानी याच्या दोन घरांवर छापा मारला होता. त्याच्याविरोधात मनी लॉण्ड्रींग प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला.