ब्रेकिंग न्यूज ! जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी यांची निवड

0
35

जळगाव –  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. तरी पण यानंतर नाट्यमय घडामोडी घडत अध्यक्षपदासाठी बंडखोरीची चर्चा सुरु झाली असून अजून दोन अर्ज दाखल झाले.

शेवटची जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय पवार यांची निवड झाली.

मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे माजी आमदार गुलाबराव देवकर यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच श्यामकांत सोनवणे यांनी देखील उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली होती.

अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ऍड रवींद्रभैय्या पाटील, संजय पवार, डॉ.सतीश पाटील व प्रदीप देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. मात्र रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाले आहे. तरी पण अजून दोन अर्ज दाखलझाले. अखेर नाट्यमय घडामोडीनंतर संजय पवार यांची निवड झाली. जिल्हा बँकेच्या सभागृहात आज सकाळी 11 वाजता निवड प्रक्रियेला सुरुवात झाली.

उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटांचे अमोल चिमणराव पाटील यांच्या नावांची चर्चा असून उपाध्यक्ष पदाचे नाव पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या बैठकीत निश्चित करण्यात येणार असल्याचे समजतेय.

Spread the love