ओरिसा. जगन्नाथ पुरी येथे २९ व्या राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग चॅम्पियनिशप स्पर्धा
२९ व्या राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग चॅम्पियनिशप स्पर्धा जगन्नाथ पुरी (ओरिसा) येथे ४ ते ७ डिंसेबर दरम्यान झालेल्या स्पर्धेत जळगावातील खेळाडू आकांक्षा म्हेत्रे हिने कांस्य पदक पटकविले.
आकांक्षा हिने व्यूमेन ज्युनियर या वयोगटात टीम टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात ४९ःनिनीट १२ सेकंद हा वेळ नोंदवून कांस्य पदक निळविले. आकांक्षाने या अगोदर देखील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी केलेली आहे. हिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. आकांक्षाला प्रशिक्षक सागर सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.सागर सोनवणे राष्ट्रीय जलतरण खेळाडू असून नगरसेवक कैलास सोनवणे यांचे पुतणे आहेत