धुळे :- भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा धुळे तर्फे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त बुधवार दिनांक १४ मे रोजी जळगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत जयसिंग वाघ यांचे सायंकाळी ७.३० वाजता कृषी नगर , मारोती मंदिर जवळ जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
जयसिंग वाघ हे प्रसिद्ध खर्डे वक्ते तसेच फुले आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून परिचित आहेत . या जाहीर व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. विलास झाल्टे राहणार असून मुख्य अतिथी म्हणून डॉ. जितेंद्र निकुंभ , ॲड. विशाल साळवे , बापूसाहेब सैंदाणे , प्राचार्य फादर विल्सन रोड्रिक्स , डॉ. गौतम शिलवंत , आसिफभाई मंसुरी ई. मान्यवर उस्थितीत राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रावस्ती बुद्ध विहार समिती , संघशक्ती लुंबिनी बुद्ध विहार समिती, त्रिरत्न बौद्ध महासंघ , बौद्ध विहार समन्वय समिती , संघमा युवा मंच , नरडाणा बुद्ध विहार समिती परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाला जनतेने मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अण्णासाहेब देविदास जगताप , मधुकर निकुंभे , नानासाहेब देवरे , दिलीप इंदवे, शशिकांत देवरे , डॉ. शरद भामरे , प्रा. भाग्यश्री बैसाणे यांनी केले आहे .