चोपडा -तालुक्यातील बुधगाव व अनवर्दे ते हातेड या रस्त्याचे दुरुस्तीचे काम चालू होते. मध्येच एक ते दोन किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण आहे. तरी या अपूर्ण रस्त्याचे कामामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना खूप कसरत करावी लागत आहे. व अपघातचे प्रमाण हि वाढत आहे.
या अपूर्ण रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा असे बुधगाव व अनवर्दे ग्रामस्थांच्या वतीने निवेदन जूनियर इंजिनिअर सोपान सोनवणे यांना सचिन शिरसाठ, सचिन धनगर,शुभम शिरसाठ राष्ट्रवादी विद्यार्थी जळगाव जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी दिले.











