बुधगाव/अनवर्दे जिल्हा परिषदेच्या शाळेत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न!!

0
12

बुधगाव-अनवर्दे जिल्हा परिषदेच्या शाळेत ” स्वतंत्र अमृत महोत्सव निमित्त,, पहिली ते चौथी चित्रकला स्पर्धा उर्वेश साळुंखे यांनी आयोजित केली होती. स्पर्धेचे विजेते विद्यार्थ्यांना व उर्वरित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.

विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्या मागचा हेतू असा आहे की विद्यार्थ्यांचे मनोबल वाढले पाहिजे.ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळते‌. त्या मुलांचे कलागुणांना वाव मिळते. व उर्वरित विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो. आपणही छान पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. आपला ही असा गौरव होईल अशी मुलांच्या मनात भावना तयार होते.

आशा सर्व गोष्टींचा अभ्यास करून उर्वेश साळुंखे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक योगेश पाटील यांनी केले.‌ बक्षीस वितरणाचा कार्यक्रम महाराष्ट्र पोलीस जितेंद्र धनगर माजी सरपंच संजय शिरसाठ , सचिन शिरसाठ, मुकेश बोरसे, मुन्ना बोरसे व शाळेतील मुख्याध्यापक वासुदेव नन्नवरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील शिक्षक लक्ष्मीकांत पाटील, गणेश सुर्यवंशी, पांडुरंग महाजन, सुचिता सौदाण, चोपडा पंचायत समिती येथून आलेल्या विशेष शिक्षिका मंदाकिनी पाटील आदी उपस्थित होते.

हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला होता‌ असे उर्वेश लक्ष्मण साळुंखे यांचे आभार शाळेतील ज्येष्ठ शिक्षक गणेश सूर्यवंशी यांनी शाळेतील शिक्षकांच्या वतीने व विद्यार्थ्यांच्या वतीने साळुंखे यांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला असे घोषित केले.                       ( छायाचित्र करण हर्षल साळुंखे)

Spread the love