बुधगाव येथील सरपंच सौ. सुनीताबाई गुलाबराव साळुंखे यांच्या निवासस्थानी सालाबादप्रमाणे यंदाही घटस्थापनेची मांडणी करण्यात आली. साळुंखे हे दरवर्षी अप्रतिम पद्धतीने नवरात्री उत्सव साजरी करता यंदाही हा उत्सव कोरोनाचे नियम पाळुन साजरा करू असे सरपंच सौ. सुनीताबाई साळुंखे म्हणाले व एकच आराधाना करेल आपल्या राज्यावर कोनोची तिसरी लाट यायला नको असे साळुंखे म्हणाले.
पौष, चैत्र, आषाढ आणि अश्विन महिन्यात प्रतिपदापासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ रात्री, महालक्ष्मी, महासरस्वती किंवा सरस्वती आणि महाकाली या तीन देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते, ज्यांची नावे व ठिकाणे अनुक्रमे नंद देवी योगमाया, शक्तीदंतिका, शाकंभरी, दुर्गा, भीम आणि भ्रामरी नवदुर्गा आहेत. नवरात्र हा एक महत्त्वाचा प्रमुख सण आहे जो संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.












