बुलढाणा – जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून, पुन्हा एकदा मलकापूर-बुलढाणा एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यांनतर हि बस घाटात पातळी झाली. या बसमध्ये एकूण ५५ प्रवासी करत होते. या बसमध्ये २० विध्यार्थी असल्याची माहिती देखील मिळत आहे. स्थानिक घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे. हि बस मलकापूर वरून बुलढाण्यावरून निघाली होती.
कसा घडला अपघात ?
एसटी बस क्रमांक ८३७५ या बसचा जॉईंचर निसटला होता. बस मध्ये जात होती. यावेळी ब्रेक लागले नाहीत. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि असपघात झाला. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींवर बुलढाणा सामान्य रुग्णालयात सुरु असल्याची माहिती मिळत आहे.











