प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव – गोंभी रस्त्यावर एका शेतात मेंढपाळ कुटुंब आपल्या गावाकडे जाताना वाटेत थांबले असता दि.४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ६ वाजे दरम्यान एक मेंढी व्याली असता मेंढीला मोठ्या प्रमाणात वेदना होत होत्या त्यामुळे मेंढपाळ कडू पदम गोयकर रा. फुलाचे विरोदा जि.बऱ्हाणपूर मध्य प्रदेश यांनी सुनसगाव पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुवैद्यकीय डॉ भावेश चौधरी यांना फोन करून बोलावून घेतले डॉ. भावेश चौधरी यांनी ही ताबडतोब येऊन उपचार केले आणि मेंढीला पाच पिल्ले झाली . या पाचही पिल्लांची तब्येत चांगली आहे.
कदाचित डॉ भावेश चौधरी यांनी वेळेवर पोहोचून उपचार केले नसते तर कदाचित मेंढीला जिव गमवावा लागला असता असे मेंढपाळांनी सांगितले.









